लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालाय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल एक कोटी 80 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. आलापूरमधील समाजवादी पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर कनौजिया यांच्या निधनामुळे या ठिकाणचे मतदान 9 मार्चला होणार आहे.  


2012 साली याच 11 जिल्ह्यातील 52 मतदारसंघात सपाला 37, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच, बसपाला 3 तर पीस पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या. 


यंदा मात्र सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांपुढे भाजपा आणि बसपाचं कडवं आव्हानं आहे. त्यामुळे इथल्या अनेक ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळतायत. गाढव, कबूतर, कसाबच्या उपमा देत पाचव्या टप्प्यातील प्रचाराची पातळी आणखी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.