मथुरा: आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नामध्ये वधू आणि वरपक्षामध्ये तूफान हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये घडली आहे. आईसक्रीमवरून वधू आणि वराच्या नातेवाईकांमध्ये आधी वादावादीला सुरुवात झाली, आणि लग्नामध्येचा हाणामारीही झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाची वर पक्षानं पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी वधूकडच्या सात जणांना अटक केली. यामुळे भडकलेल्या वधूच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी वधूकडच्या सात जणांना अटक केली आहे. या सगळ्या राड्यानंतर हे लग्न मोडलं नसतं तरच नवल.