अर्थमंत्री अरूण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढतांना घसरले
हरिद्वार जिल्ह्यात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये चढतांना अचानक घसरले. हरिद्वारच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, ‘केंद्रीय अर्थमंत्री हेलीकॉप्टरमध्ये चढतांना घसरले पण ते ठिक आहेत आणि त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसून दिल्लीसाठी रवाना झाले.
देहरादून : हरिद्वार जिल्ह्यात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये चढतांना अचानक घसरले. हरिद्वारच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितलं की, ‘केंद्रीय अर्थमंत्री हेलीकॉप्टरमध्ये चढतांना घसरले पण ते ठिक आहेत आणि त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसून दिल्लीसाठी रवाना झाले.
जेटली हरिद्वार शहरापासून २० किलोमीटर दूर बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहण्यासाठी गेले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, योग गुरू बाबा रामदेव यांच्यासोबत पार्कमध्ये फेरफटका मारल्यानंतर ते त्यांच्या हेलिकॉप्टरवर चढत असताना घसरले. शुगर लेवल अचानक वाढल्यामुळे ते घसरले पण त्यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.