नवी दिल्ली : पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांकडून काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांना आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची चौकशी करण्यासाठी NIAचं पथक काश्मीरमध्ये पोहोचलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिलानी यांच्यासह लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद, पाकिस्तानी अतिरेक्यांकडून पैसे घेत असल्याचं स्टिंग ऑपरेशनमध्ये मान्य करणारा नईम खान यांची नावं NIAच्या प्राथमिक तपासात नोंदवण्यात आली आहेत. याखेरीज तेहरीक ए हुर्रीयतचे फारूख अहमद दर ऊर्फ बिट्टा कराटे आणि गाझी जावेद बाबा हेदेखील NIAच्या रडारवर आहेत.