3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर लागणार दंड
बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी घातली होती. आता 1 एप्रिलपासून जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकचा रोख व्यवहार करेल त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकची रोख रक्कम स्विकारेल त्याला दंड लावण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 3 लाखापेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी घातली होती. आता 1 एप्रिलपासून जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकचा रोख व्यवहार करेल त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार आहे. जी व्यक्ती 3 लाखापेक्षा अधिकची रोख रक्कम स्विकारेल त्याला दंड लावण्यात येणार आहे.
उदा. जर तुम्ही चार लाख रुपयांची रोख रक्कम स्विकारता तर तुम्हाला दंड द्यावा लागेल. अशाच प्रकारे 50 लाखांच्या रोख रक्कमेवर दंड 50 लाख रुपये द्यावे लागणार. रक्कम स्विकारणाऱ्या व्यक्तीवर हा दंड आकारण्यात येणार आहे.