चेन्नई :  राज्यसभा खासदार शशिकला पुष्पा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.   बेकायदा डांबून ठेवणे आणि लैंगिक शोषणप्रकरणी शशिकला पुष्पा तसेच पती आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकला पुष्पा यांना यापूर्वीच तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षातून निलंबित करण्यात आलेले आहे.


शशिकला पुष्पा यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेने त्यांच्यासह,  पती लिंगेश्‍वरा थिलागन,  मुलगा एल. प्रदीप राजा यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुटीकोरीन जिल्ह्यातील पुदुकोट्टाय येथे ऑल वूमन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. 


 तुटीकोरीनच्या पोलिस अधीक्षकांनी महिलेची तक्रार पुदुकोट्टाय ऑल वूमन पोलिस ठाण्याकडे पाठविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकला पुष्पा तुटीकोरीनच्या महापौर असताना २०११ ते २०१४ या काळात ही महिला तिच्या बहिणीसह त्यांच्या घरी काम करत होती.