नवी दिल्ली : पर्वतरांगांमध्ये असलेल्या घनदाट जंगलात लागलेल्या आगीचे लोळ थांबण्याचं नाव घेत नाहीत... उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या जंगलांनाही आगीनं घेरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनक्षेत्रांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांमुळे सर्वात जास्त फटका डोंगराळ भागातील राज्य असलेल्या उत्तराखंडला सर्वाधिक बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच जवळपास २५५२ हेक्टर जंगली क्षेत्र आगीत भस्मसात झालंय. 



या आगीत आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३० वर पोहचलीय. एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, जंगलातील आगीवर ७० टक्के ताबा मिळवण्यात यश आलंय. 



रविवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी वनविभागात आग लागली. एएनआयच्या माहितीनुसार, शिमल्यात १२ वन विभागांमध्ये आग लागलीय. यामुळे जवळपास ५० हेक्टर जंगलाचा भाग प्रभावित झालाय.