हॉटेलमध्ये लागली आग, धोनीसह सर्व खेळाडू सुरक्षित
राजधानी दिल्लीमधील द्वारका येथील एका हॉटेलला आग
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील द्वारका येथील एका हॉटेलला आग लागली. ज्या हॉटेलमध्ये आग लागली त्या हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि झारखंडची क्रिकेट टीम थांबली होती. खेळाडुंना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. पण या आगीत खेळाडूंचे साहित्य जळून खाक झाले आहे.
झारखंड टीम विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यासाठी दिल्लीमध्ये आहे. हा सामना बंगाल विरोधात शुक्रवारी पालम मैदानावर खेळला जाणार आहे. आग लागल्यामुळे हा सामना शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
दुर्घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती आहे. फायर सर्विसला सकाळी ६.३० वाजता आग लागल्याची माहिती कळाली. ७.५० मिनिटांनी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं.