नवी दिल्ली : समाजवादी पार्टीतला राजकीय यादवी टोकाला गेलाय. पक्षाच्या सायकल या अधिकृत चिन्हासाठी पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष चिघळलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी दिल्लीत निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली. सायकल हे चिन्हं आपल्यालाच मिळालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.


 

मात्र. अखिलेश यादव यांच्या गटानंही चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगाची वेळ मागितलीय. त्यांना आज सकाळी साडे अकराची वेळ देण्यात आलीय.


मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव या दोघांचाही आपलाच पक्ष मूळ असल्याचा दावा आहे. 


दरम्यान, पक्षाच्या फुटीशी आपला संबंध नसल्याचा दावा करणारे अमर सिंह लंडनहून दिल्लीत परतलेत. मुलायमसिंग यांच्या निवासस्थानी दिवसभर खलबतं केल्यानंतर अमरसिंग निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे अमरसिंगांची या संघर्षातली भूमिका अधेरेखित झालीय.