घरातच सेक्स रॅकेट चालवायची ही महिला, इतर राज्यातून तरूणींचा पुरवठा
देहव्यापार चालविणाऱ्या एका घरावर छापा टाकून पोलिसांनी घराची मालकीनसह तीन महिला आणि एका पुरूषाला ताब्यात घेतले आहे.
होशियारपूर : देहव्यापार चालविणाऱ्या एका घरावर छापा टाकून पोलिसांनी घराची मालकीनसह तीन महिला आणि एका पुरूषाला ताब्यात घेतले आहे.
गुप्त सुत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की, सतविदंर कौर ही महिला तिच्या घरातच देहव्यापार चालवत असून, इतर राज्यातील मुलींना ती या व्यवसायात ओढत आहे. त्यानुसार या सेक्स रॅकेटमध्ये आणखी किती मुली अडकलेल्या आहेत. याचा तपास पोलिस घेत आहेत. सतविदंरची कसून चौकशी..
- या सेक्स रॅकेटची मुख्य सुत्रधार असलेल्या सतविंदरची पोलिस कसून चौकशी करत आहेत.
- सतविदंर कौर, सतविंदर सिंह, पूनम, गुडिया, बलविंदर कौर यांना अटक झाली आहे.
- एसएचओ राजेश अरोडा यांनी सांगितले, सतविदंरची कसून चौकशी केली आहे. या व्यवसायात तीने कुठून मुलींना आणले आहे. याचाही तपास पोलिस घेत आहेत.
- चौकशीमध्ये सतविदंरने सांगितले की, हरियाणा, दिल्ली, यूपी येथून ती मुलींना बोलावत होती.