मुंबई : फ्लिपकार्टच्या वेबसाईटप्रमाणे आपला बायोडाटा बनवणाऱ्या तरुणाला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली असली तरी त्याचे भाग्य मात्र आता उजळलेय. आता त्याला इतर स्टार्टअप कंपन्यांकडून अनेक जॉब ऑफर्स आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ वर्षे वय असणाऱ्या आकाशने आपले शिक्षण आयआयटी खरगपूर येथून पू्र्ण केले आहे. नोकरीच्या बाजारात उठून दिसण्यासाठी त्याने त्याचा बायोडाटा फ्लिपकार्टच्या वेबसाईट प्रमाणे बनवून तो अपलोड केला होता. त्याचा हाच बायोडाटा इंटरनेटवर चर्चेचा विषय झाला होता.


फ्लिपकार्ट त्यांच्या कॅम्पसमध्ये भरतीसाठी आले होते. पण, सहा गुणांमुळे आपण या भरतीत सामील व्हायला पात्र ठरणार नाही, अशी आकाशला खात्री होती. म्हणूनच त्याने असे काहीतरी हटके करण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा बायोडाटा इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर त्याला आता अनेक ठिकाणांहून नोकरीसाठी विचारणा केली जातेय. दरम्यान फ्लिपकार्टने मात्र या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.