मुंबई : ऑनलाईन बाजारात ग्राहक मिळवण्यासाठी स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. सध्या देशातली सर्वात मोठी ऑनलाईन खरेदी विक्री कंपनी अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी फ्लिपकार्टने ई-बे ही ऑनलाईन पोर्टलचा भारतातला व्यवसाय विकत घेतला आहे. त्यामुळे ई कॉमर्समध्ये अधिक स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत फ्लिपकार्टमध्ये झालेली सर्वात मोठी परदेशी गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. फ्लिपकार्टमध्ये चीनी कंपनी टेन्सेट, टेक्नॉलॉजी जायंट मायक्रोसॉफ्ट आणि अमेरिकन ऑनलाईन पोर्टल ई-बे यांनी मिळून एकूण 9 हजार कोटी रुपये गुंतवल्याचं फ्लिपकार्ट कंपनीने म्हटले आहे.


अॅमेझॉनने भारतात गुंतवणुकीचा सपाटा लावलेला असल्याने फ्लिपकार्टच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय की काय, अशी स्थिती होती. गेल्या चारवर्षात फ्लिपकार्टची नेटवर्थ चार अब्ज डॉलर्सनी कमी झाली आहे. अॅमेझॉनशी स्पर्धा करणे त्यांना जड होत असताना मिळालेली गुंतवणुकीमुळे आता स्पर्धा वाढणार असून फ्लिपकार्ट आता अॅमेझॉनला टक्कर देण्यास तगडे आव्हान उभे करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.