श्रीनगर : सध्या काश्मीर अशांत आहे. दगडफेक, चकमकी यामुळे पृथ्वीवरचा हा स्वर्ग नरकयातना भोगतोय. हे चित्र पाटलण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ती निसर्गातच आहे. तापमानात जसजशी वाढ होतेय, तसतसा काश्मिरी फुलांचा मौसमही जवळ येतोय. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुंदर बगिचे फुलवण्याची खटपट सुरू आहे.


काश्मीरचं हे सौंदर्य जसं तिथल्या हिमशिखरांमुळे आहे तितकंच ते तिथले बगिचे, फुलं यामुळे. आता तापमान वाढेल आणि उन्हाळ्यात येणाऱ्या फुलांनी काश्मीरचं खोरं बहरून उठेल. या फुलांकडे आकर्षित होऊन पर्यटकांनी राज्यात यावं यासाठी काश्मीर सरकारनं कंबर कसली आहे. सरकारच्या फूलशेती विभागानं तमाम बाग-बगिचे आणि बॉटेनिकल गार्डन्स सुशोभित करण्यास सुरूवात केली आहे.