बंगळुरू : फरार झालेल्या प्रियकराला शोधण्यासाठी एका 19 वर्षीय महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं... पण, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्या हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिनं तिचं मृत अर्भकही होतं... हे दृश्यं पाहून पोलिसांनाही धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना घडलीय बंगळुरूमधल्या चिक्कमगलूरू जिल्ह्यात... आजमपुरा पोलीस स्टेशनमध्ये गर्भवती असल्याचं समजल्यानंतर आपल्याला एकटं सोडून फरार झालेल्या प्रियकराला शोधून काढण्यासाठी ती दाखल झाली होती... त्यानं आपल्याशी विवाह करावा, यासाठी ती पोलिसांना विनवत होती. 


तिच्याच गावात राहणाऱ्या कांताराजा आणि दिव्याचे वर्षभरापूर्वीपासून प्रेमसंबंध जुळले होते... पण, दिव्या गर्भवती आहे हे कळल्यापासून कांताराजा तिला टाळत होता... आपले आई-वडील या लग्नासाठी तयार होत नसल्याचं म्हणत तो लग्न टाळत होता... त्यानंतर काही दिवसांनी तो फरार झाला.


आपला गर्भपात झाल्याचं दिव्यानं पोलिसांना सांगितलं.  


...आणि तो सापडला!


या घटनेनंतर धक्का बसलेल्या पोलिसांनी कांताराजाला शोधून काढलं... समुपदेशनानंतर तो दिव्यासोबत लग्नाला तयार झाला... आणि त्यांचं एका मंदिरात आणि रजिस्टर पद्धतीनंही लग्न पार पडलं.