गाझियाबाद : वैशाली मेट्रे स्टेशनवरुन घरी जात असताना माझे चार तरुणांनी अपहरण करताना डोळ्यावर पट्टी बांधली, अशी माहिती बेपत्ता इंजिनिअर दीप्ती सारना हिने दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीप्ती स्नॅपडील या ऑनलाईन कॉमर्स कंपनीत नोकरी करते. ती रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी रिक्षातून परतत असताना बेपत्ता झाली होती. तिचे लोकेशन पानीपत येथे ट्रेस झाले. तिने घरी फोन करुन सांगितले, मी सुखरुप आहे. त्यावेळी कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. ज्यावेळी ती सकाळी घरी पोहोचली त्यावेळी ती भेदरलेली होती. काहीही न बोलता वडिलांना मिठ्ठी मारली आणि घरी झोपी गेली. ती ठिक आहे, असे तिच्या वडिलांनी सांगितले. ती झोपून उठल्यानंतर तिच्याशी बोलून मीडियाला माहिती देईन, असे वडिलांनी मीडियाशी बोलताना सांगितले.


दीप्ती बुधवारी रात्री बेपत्ता झाली होती. ती आयटी इंजिनिअर आहे. गुडगावमध्ये ती नोकरी करती आहे. ८ वाजता वैशाली मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षा केली. मात्र, काहींनी ही संधी साधत तिचे अपहण करण्यात आले. तिला एकाला भेटायचे आहे, असे सांगून अज्ञातस्थळी डोळ्यावर पट्टी बांधून नेले. तुला आम्ही काहीही करणार नाही, असे या तरुणांनी मला सांगितल्याची माहिती दीप्तीने दिली.