पाटणा : गेल्या काही दिवसांपासून नोटा बदलाचा घोळ सुरूच आहे. यात नागरिकांच्या संयमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण बिहारमध्ये मात्र महिलांचा संयम सुटलेला दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या दानापुरमध्ये फुलवारीशरीफ या भागात महिलांचा संयम सुटला. बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये अशी काही फ्री स्टाईल रंगली की रांगेत लागून थकलेल्या कंटाळलेल्या लोकांच मनोरंजन झालं असंच म्हणावं लागेल. 


नळावरची भांडणं तशीच ही बँकेवरची भांडणं. गंमत म्हणजे फुलवारीशरीफ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अब्दुल गफारही तिथेच उपस्थित होते. पण ही हाणामारी बघुन काही क्षण तेही बुचकळ्यात पडले. फक्त रांगेत मागे पुढे सरकण्यावरून या दोघींमध्ये फ्री स्टाईल रंगली आणि मग काही वेळाने धक्कातून सावरलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून ही फ्री स्टाईल थांबवली.