मुंबई :  मुंबई भाजयुमोचा माजी अध्यक्ष गणेश पांडे याने म्हटलंय, महिला सहकारीने माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. माझ्याविरोधात रचलेले हे राजकीय षडयंत्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझी बदनामी करून मला संपवायचे आहे. मात्र, आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. याबाबत मी कोणत्याही चौकशीला तयार आहोत असं गणेश पांडे याने म्हटलं आहे.


अगदी माझी आणि त्या महिलेची नार्को टेस्ट घेतली तरी हरकत नाही, अशी प्रतिक्रिया गणेश पांडेने दिली आहे. गणेश पांडे आज प्रथमच माध्यमांसमोर आला आणि आपण निर्दोष असल्याचे सांगितले. गणेश पांडेवर चार दिवसापासून गंभीर आरोप होत आहेत.