लग्नात मुलीने केली १० हजार झाडांची मागणी
मध्य प्रदेशातील प्रिंयका भदोरिया या तरुणीने लग्नाच्या आधी सासरच्या लोकांसमोर अशी मागणी केली की तुम्हाच्या भुवया उंचावतील.
भोपाळ : मध्य प्रदेशातील प्रिंयका भदोरिया या तरुणीने लग्नाच्या आधी सासरच्या लोकांसमोर अशी मागणी केली की तुम्हाच्या भुवया उंचावतील.
१० हजार झाडांची मागणी
प्रिंयकाने तिच्या सासरच्या लोकांना सांगितलं की जो पर्यंत तुम्ही १० हजार झाडं नाही लावत तो पर्यंत ती लग्न नाही करणार. त्यानंतर प्रियंकाची ही मागणी सासरच्या लोकांनी मान्य केली आणि लग्न व्यवस्थित पार पडलं.
मुलीचं सर्व स्तरातून कौतूक
लग्नाआधी जेव्हा मुलींना विचारलं जातं की तुम्हाला काय हवं आहे त्यावर अनेक मुली या दागिने, कपडे मागतात पण प्रिंयकाने केलेली ही मागणी अत्यंत कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल.
प्रियंका ही वयाच्या १० व्या वर्षापासून झाडे लावण्याचं काम करत आहे आणि याला योगायोगच म्हणावं की तिचं लग्न ही अर्थ डेच्या दिवशीच झालं. प्रियंकाच्या पतीने देखील पत्नीची पर्यावरणाबाबत असलेली जागृकतेचं कौतूक केलंय. आता ५ हजार झाडं ही माहेरी तर ५ हजार झाडं ही सासरी लावली जाणार आहेत.