बलात्कारापासून बचावासाठी दुसऱ्या मजल्यावरून उडी
बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी, एका 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना हावडा येथे रविवारी रात्री घडली.
कोलकाता : बलात्कार होण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी, एका 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही घटना हावडा येथे रविवारी रात्री घडली.
या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तिचा मित्र आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
ही मुलगी आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेली होती, तेव्हा २ जण त्याठिकाणी होते. त्यांनी तिला शीतपेय पिण्यास देऊन जबरदस्ती केली. तसेच तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली.
तिला आपला बचाव करत बाल्कनीतून खाली उडी मारली. मुलगी खाली पडल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तसेच या तिघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.