पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचे शपथ घेतलेले मनोहर पर्रिकर या विश्वासदर्शक ठरावासाठी सज्ज झालेत. 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदारांचं पाठबळ आवश्यक आहे. आपल्याकडे 22 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा भाजपनं केलाय.


दुसरीकडे पर्रिकर सरकार कसं अल्पमतात आणता येईल याविषयी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी मगोप आणि अपक्ष रोहन खंवटे यांना भाजपकडून काँग्रेसकडे खेचून आणण्याची जबाबदारी दिगंबर कामत आणि विश्वजीत राणे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. दुसरीकडे विश्वजीत राणे पक्षावर नाराज असून त्यांनी तशी नाराजी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कळवलीय.