नवी दिल्ली : जागतिक बाजारात दोन्ही धातुंच्या किंमतीत साधारण तेजी आणि स्थानिक स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रतितोळा २९,८५० रुपये होता. तर चांदीचे दर प्रतिकिलोसाठी ४२,८०० रुपये होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही किंमती धातूंचा बाजार सुस्त होता. न्यूयॉर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार, सोने २.१५ डॉलरच्या तेजीसह १,२३३.८० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. काल सोने १,२३५ डॉलर प्रति औंस इतके होते.


बाजारविश्लेषकांच्या मते आर्थिक तसेच राजकीय उलाढाली होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर तेजीत राहू शकतात. यादरम्यान लंडनमध्ये चांदी ०.०५ डॉलरनी मजबूत होत ती १७.७० डॉलर प्रति औंस या दराने विकली गेली.