नवी दिल्ली : खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून घेतलेले दागिने जप्त होणार नाहीत, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक विवाहित महिलेला 500 ग्रॅम म्हणजे 50 तोळे, अविवाहित स्त्रीला 250 ग्रॅम म्हणजे 25 तोळे आणि पुरुषाकडे 100 ग्रॅम म्हणजे 10 तोळ्यांपेक्षा जास्त सोने जप्त केलं जाऊ शकतं. याचाच अर्थ विवाहित महिलांना 50 तोळे, अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषांना फक्त 10 तोळे घरात ठेवता येणार आहे. यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.


लोकसभेत संमत करण्यात आलेल्या सुधारित आयकर कायद्याच्या अनुषंगाने सरकारने काही महत्त्वाची स्पष्टीकरणे जारी केली आहेत.


 घरात पूर्वजांपासून असलेले सोन्याचे दागिने किंवा महिलांनी आपल्या बचतीतून घेतलेल्या दागिन्यांवर कसलाही टॅक्स आकारला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आयकर विभागाच्या छाप्यात, घरातील पारंपरिक किंवा पूर्वजांपासून पिढ्यानपिढ्या असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर कोणताही कर नसेल किंवा जप्तीचा प्रश्न नाही.