मुंबई : सोन्याच्या भावात जबरदस्त घसरण पाहायला मिळतेय. मुंबईत २३ कॅरेटच्या एक तोळा सोन्यासाठी २८, ७०० रूपये मोजावे लागत आहेत. काल हाच भाव होता २९,१०० रूपये प्रति १ तोळा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारीही सोन्याच्या किंमतीतली घसरगुंडी सुरूच राहील. २५० रुपयांनी घसरून गेल्या ६ महिन्यांच्या खालच्या स्तरावर पोहचलं. सोनं २८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर येऊन पोहचलंय.


आंतरराष्ट्रीय स्तरावर ढासळलेल्या सोन्याच्या किंमतींमुळे हा बदल पाहायला मिळालाय. त्यामुळे, घरगुती बाजारातही सोन्याच्या किंमती ढासळत चालल्यात. 


चांदीच्या किंमतीही ढासळलेल्या पाहायला मिळत आहेत. चांदी १०० रुपयांनी घसरून ४१,१०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचलेली पाहायला मिळाली. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोमवारी न्यूयॉर्कमध्ये सोनं ०.६० टक्के घसरून १,१७० डॉलर प्रति औंसवर पोहचलं तर चांदी ०.०६ टक्क्यांनी घसरून १६.७१ डॉलर प्रति औंस वर येऊन दाखल झालंय.