नवी दिल्ली : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला काही सोन्याची वस्तू गिफ्ट द्यायचा विचार तुम्ही नक्की करू शकता... कारण, पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती ढासळलेल्या दिसून येत आहेत... आणि या वेळेचा फायदा तुम्ही नक्की उचलू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक स्तरावर विक्रेत्यांकडून होणारी खरेदी मंदावल्यानं सोन्याचे दर पडल्याचं सांगितलं जातंय. सोन्याच्या किंमती जवळपास ६०० रुपये प्रति १० ग्रामनं खाली आल्यात.


सोन्यात गेल्या ११ दिवसांमध्ये तब्बल २६०० रुपयांची तेजी दिसून आली होती. परंतु, दिल्ली सराफा बाजारात २९,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर सोनं पोहचलंय.


चांदीतही मागणी घटल्यानं ५० रुपयांची पडझड दिसून आली. सध्या चांदी ३७,८०० रुपये प्रति किलोवर येऊन पोहचलीय.