नवी दिल्ली : सोने सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. पुन्हा एकदा सोने दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाराजारात सोने खरेदीत मंदी दिसून येत आहे. बुधवारी वायदा बाजारात १० ग्रॅम सोने (प्रति तोळा) दरात १५८ रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोने २९९४० रुपयांवर खाली आले.


मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये जूनचा विचार करता सोने दर १५८ रुपयांनी कमी झाला. ०.५२ टक्के घसरुन हा दर २९९४० रुपये प्रति तोळा खाली आला. तर एप्रिल महिन्याचा विचार करता सोने २२ लॉट बाजारात १४८ रुपये म्हणजेच ०.५० टक्के घटून २९६६२ रुपये प्रति तोळ्यावर खाली आला.


बाजार तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारात मंदीचे सावट असल्याने याचा लाभ घरच्या वायदा बाजाराला झाला आहे. त्यामुळे पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळेल.