सोन्याच्या दरात मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या दरांनी आज चार वर्षांचा उच्चांक गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि ब्रेक्झिट याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झालाय.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या दरांनी आज चार वर्षांचा उच्चांक गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि ब्रेक्झिट याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झालाय.
सोन्याच्या दरात मोठी वाढ होत ते प्रतितोळा ३२ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेत. गेल्या चार वर्षातील हा उच्चांकी दर आहे.
सोन्यासह चांदीच्या दरातही तब्बल २८ टक्क्यांनी वाढ झालीये. बुधवारी सोन्याचा दर प्रतितोळा ३१ हजार 953 रुपये असा होता. पुढील काही महिन्यांत सोन्याचे दर ३३, ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.