नवी दिल्ली : सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २५० रुपयांनी घसरत २९,३५० रुपये प्रतितोळ्यावर बंद झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन आठवड्यांतील ही नीचांकी दर आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घट झालीये. दुसऱीकडे चांदीच्या दरातही घसरण झालीये. चांदींच्या दरात ६०० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१ हजार रुपयांवर बंद झाले. 


दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रतितोळा २९,३५० आणि २९,२०० रुपये होती. सोमवारी सोन्याच्या दरात ३५० रुपयांची तर मंगळवारी ५० रुपयांची घसरण पाहायला मिळाली.