नवी दिल्ली : गुरुवारी सोन्याच्या दरात आलेली तेजी दीर्घकाळ टिकली नाही. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याचे दर शुक्रवारी १५० रुपयांनी कमी होत प्रतितोळा २८,९५० रुपयांवर बंद झाले तर चांदीच्या दरातही ३५० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१ हजार रुपये राहिले.


गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र ही वाढ जास्त काळ टिकू शकली नाही. आज पुन्हा सोन्याचे दर घसरले. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे सोन्याचे दर प्रतितोळा अनुक्रमे २८,९५० आणि २८,८०० रुपये होते.