नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना याचा फायदा देणार आहे. एकानंतर एक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दाखवली आहे. एसबीआयननंतर अनेक बँकांनी देखील व्याजदरात कपात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यांसाठी होम लोन, कार लोन आणि इतर कर्ज स्वस्त झाले आहे. याचा सरळ परिणाम ईएमआयवर होणार आहे. त्यामुळे ईएमआय कमी होणार होणार. SBI, PNB, यूनियन बँक ऑफ इंडिया, ओरिअंटल बँक ऑफ कॉमर्स, देना बँक, ICICI, AXIS अशा अनेक बँकांनी व्याजदरात कपात केली आहे.


बँकांच्या या निर्णयामुळे आता लोकांना होम लोन, गाडी किंवा इतर गोष्टींसाठी कमी व्याजदरात लोन मिळणार आहे. लोकांना घरे किंवा गाडी घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. याचा फायदा इतर क्षेत्राला देखील होणार आहे.