सरकारने एलईडी बल्बची किंमत केली कमी
देशात वीज बचत करण्याच्या हेतूने सरकारने एलईडी बल्बच्या किंमती आणखी कमी केल्या आहेत. सरकारने एलईडी बल्ब ५५ रुपयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. एनर्जी ईफिसिएंसी सर्विस लिमिटेड द्वारे बुधवार पासून हे बल्ब विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. उर्जामंत्री पियुष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : देशात वीज बचत करण्याच्या हेतूने सरकारने एलईडी बल्बच्या किंमती आणखी कमी केल्या आहेत. सरकारने एलईडी बल्ब ५५ रुपयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. एनर्जी ईफिसिएंसी सर्विस लिमिटेड द्वारे बुधवार पासून हे बल्ब विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. उर्जामंत्री पियुष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
या योजने अंतर्गत ८८ दशलक्ष बल्ब दिले जाणार आहेत. एलईडी बल्ब हा सीएफएल आणि इतर बल्बच्या मानाने अधिक काळ चालतो. हे बल्ब वीज ही कमी घेतात.