`गरज पडली तर मुस्लीम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू`
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.
एकतर्फी घटस्फोट समाजासाठी योग्य नाही. शिवाय हलाला आणि बहुविवाह यामुद्द्यांवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. जर पाकिस्तान आणि बांग्लदेश सारखे कट्टर मुस्लिम देश अशा वाईट रुढींना फाटा देऊ शकतात, तर भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात आजपर्यंत फक्त वितंड वादच रंगत आलेत..त्यावर ठोस निर्णय झाला नाही. याशिवाय देशातल्या अनेक उच्च न्यायालयांनी सलग तीन तलाक देण्याच्या विरोधात निर्णय दिल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.