नवी दिल्ली : काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे.  देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे.  त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.


मोदींनी घेतलेले पाच निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) भारतीय लष्कराच्या मूळ ठिकाणांवर आता पॅरा कमांडो  सुरक्षा करणार आहेत. अगोदरपासूनच वायू सेनेच्या हवाई मार्गाची सुरक्षा ‘गरुड’ पॅरा कमांडो करतात तर नौसेनेसाठी‘मारकोस’ कमांडो काम करतात.


२) एलओसी आणि सीमेच्या सुरक्षेसाठी जास्त सुरक्षाबळ तैनात करण्यात येणार.


३) एलओसीच्या देखरेखीसाठी सेना आता ड्रोनचा वापर करणार आहे. सध्या ड्रोनचा वापर काही भागांपर्यंतच मर्यादित आहे.


४) उरीसारख्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सीमा ओलांडून येणाऱ्या दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी सेनेकडून ‘स्वच्छता अभियान’ सुरू करण्यात येणार आहे.
 
५) पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्यासाठी चर्चेत असणाऱ्या पाकिस्तानच्या ‘बॅट’ म्हणजेच बॉर्डर अॅक्शन टीमचा सामना करण्यासाठी भारतीय सेनेच्या ‘घातक’ बटालियनची नियुक्ती केली जाणार आहे.