लवकरच सर्व नागरिकांना मिळणार ई-पासपोर्ट
सरकार लवकरच नव्या पिढीसाठी ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक फिचर्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक डिटेल्स उपलब्ध होणार आहे.
मुंबई : सरकार लवकरच नव्या पिढीसाठी ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक फिचर्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक डिटेल्स उपलब्ध होणार आहे.
रिपोर्टनुसार लोकसभेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देत असतांना परराष्ट्र धोरणांशी संबंधित खात्याचे राज्यमंत्री वीके सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. वीके सिंह यांनी म्हटलं की, सरकार ई-पासपोर्टच्या खरेदीच्या प्रकियेत आहे. ई-पासपोर्ट डेटाला सुरक्षित ठेवण्यासोबतच बनावट पासपोर्ट्सच्या समस्यापासूनही सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
एक ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप असणार आहे. चिपमध्ये ती सगळी माहिती असेल जी पासपोर्ट डेटामध्ये उपलब्ध असते. हे प्रकिया कधीपासून सुरु होणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.