नवी दिल्ली : नोटबंदीनंतर आता महिना संपत आला आहे. त्यामुळे पगाराची वेळ जवळ आली आहे. नवा महिना सुरु होताच लोकांना पगार द्यावे लागणार आहेत. दूधवाला असो की पेपरवाला त्यांना रोख रुपये द्यावे लागणार आहे. पण पगार मात्र अनेकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्येच मिळतो. त्यामुळे आता या समस्येपासून निपटण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिजर्व्ह बँकेचे डेप्ट्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांच्या नेतृत्वात एक टीम बनवली गेली आहे. ही टीम पे-डे म्हणजे पगार वाटण्यासाठी रणनिती तयार करत आहे. 


मागच्या महिन्यांच्या आकड्याच्या आधारावर अंदाज बांधला जातोय की किती नोटा लागतील.


ज्या भागात जितके पैसे काढले जातात त्या नुसार तेथे पैसे पाठवले जाणार आहेत.


एटीएमवर लांब रांगा लागू नये म्हणून काही ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. जलद गतीने पैसे भरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


30 तारखेपर्यंत ९० टक्के एटीएममध्ये हवे असलेले बदल पूर्ण केले जाणार आहेत. कारण 100, 500 आणि 2000 च्या नोटा एकसोबत निघाव्यात.


500 रुपयांच्या नोटांचं जास्तीत जास्त वितरण करण्याचं काम सुरु झालं आहे. पुढील आठवड्यात मोठ्या प्रमाणात त्या उपलब्ध होतील.


एटीएममधून अजूनही जास्तीत जास्त २५०० रुपयेच काढू शकता. 27 तारखेनंतर ही रक्कम वाढवली जाणार की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती नाही.


सरकारने खाजगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी प्री-पेड कार्डचा वापर करण्यासाठी सांगत आहे. असं केल्यास कंपन्यांना रोख रक्कमची गरज भासणार नाही. 


पुढच्या महिन्यात पैशांची समस्या तयार होऊ नये म्हणून हवे ते प्रयत्न सुरु झाले आहेत. सरकारकडून कमीत कमी लोकांना त्रास व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत.