अभय योजनेचे पैसे स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी
केंद्र सरकारच्या नव्या अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारनं सर्व सहकारी बँकांना बंदी केली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारनं सर्व सहकारी बँकांना बंदी केली आहे. 50 टक्के कर भरून काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारनं योजना जाहीर केलीये. 31 मार्चपर्यंत ही योजना लागू आहे, मात्र आता सहकारी बँका या योजनेत रक्कम स्वीकारू शकणार नाहीत.
याआधी नोटबंदी जाहीर केल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा सहकारी बँकांनी स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली होती. काळा पैसा पांढरा करण्यासाठी सरकारी बँकांचा वापर होईल, अशी शंका केंद्र सरकारला असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं होतं, आणि आता पुन्हा एकदा सरकारकडून अभय योजनेचे पैसे स्वीकारायला मनाई केली आहे.