नवी दिल्ली: गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये नेतृत्वबदल करण्याचा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घेतल्याचं कळतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, आनंदीबेन पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यात आनंदीबेन पटेल यांना अपयश आल्याचं सांगितलं जातं आहे. 


पंजाबच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती होणार असल्याचं समजतंय. गुजरातमधलेच आरोग्यमंत्री नितीनभाई पटले यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.