सुरत : भुवनेश्वरमधील रोडशोनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये मेगा रोडशो करणार आहेत.. याच वर्षी गुजरात विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्यात.. त्यासाठी भाजपनं जय्यत तयारी सुरु केलीये... त्याधर्तीवर मिशन गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतमध्ये सात किलोमीटर लांब रोडशो करणार आहेत.


पाटीदार समाजाच्या आंदोलनानंतर गुजरातमध्ये मोदींचा हा पहिलाच रोडशो असणार आहे.. या रोडशोसाठी सूरतमध्ये जय्यत तयारी करण्या आली आहे.. या रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत..