नवी दिल्ली : जर्मनीत फसलेली भारतीय महिला गुरप्रीत आणि तिच्या सात वर्षीय मुलीला भारतात आणण्यात आलेय. गुरुवारी दिल्ली विमातळावर गुरप्रीत हिचे स्वागत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले.


हरियाणातील फरिदाबादमधील गुरप्रीत हिने मंगळवारी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत तिने म्हटले होते की, पतीच्या घरचे आपला छळ करीत आहेत. त्यामुळे माझ्यावर जर्मनीतील आश्रीत कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आलेय. तसेच आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला होता. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी याची दखल घेत तिची सुटका केली.