धारवाड : सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आपला मुलगा दबला गेला ही बातमी समजताच हणमंतप्पा कोप्पड यांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली होती... पण, तरीही 'तो परत येणार...' असं माझं मन मला सांगत होतं, असं हणमंतप्पाच्या आईनं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हणमंतप्पा गायब असल्याची बातमी येऊन धडकली आणि घरभर शांतता पसरली. त्याची पत्नी, वडील आणि आईच्या डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. 


या घटनेनंतर काही दिवसांनी सेनेनं बेपत्ता झालेल्या १० जवानांना मृत म्हणून घोषित केलं... तरीही हणमंतप्पाच्या आईचा मात्र यावर विश्वास बसत नव्हता. 


'माझ्या मुलानं माझ्या स्वप्नात येऊन मला सांगितलं होतं... की आई मी परत येणार आहे' अशी भाबडी आशा या आईनं बोलून दाखवलीय. पण, तिची ही भाबडी आशाच खरी ठरली... आणि दुर्घटनेनंतर तब्बल नऊ दिवसांनी हणमंतप्पाला बर्फाखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं. 


हणमंतप्पावर सध्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तो आयुष्याची ही लढाई जिंकणार, असं आत्तादेखील या आईला वाटतंय.