दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात : मोदी
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात नसून दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
अमृतसर : आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात नसून दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी ४० देशांचे प्रतिनिधी पंजाबमधील अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत. हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या उद्घाटन भाषणाच्यावेळी ते बोलत होते. मोदींनी अप्रत्यक्षणे पाकिस्तानवर जोरदार टीका केली. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारत सर्वोतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
दहशतवाद ही अफगाणिस्तानची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे दहशतवादावर हार्ट ऑफ एशिया परिषदेत चर्चा होणार आहे. सीमेवरील दहशतवादी कारवाया या अफगाणिस्तानसह भारतासाठीदेखील डोकेदुखी ठरत आहेत. सीमांवरील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात दहशतवादाच्या मुद्यावर भारत-अफगाणिस्तानचे एकमत झाले आहे.
मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे. सकाळी एशिया इस्तंबूल प्रोसेसचे औपचारिक उद्घाटन करणार झाले. पंतप्रधान मोदी आणि अशरफ घनी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम झाला.