मुंबई : भारतात ज्या आजाराने सर्वात जास्त लोक त्रस्त असतात, अशा डेग्यूच्या आजारावर हर्बल औषध आता मिळू शकत. भारतीय शास्त्रज्ञांनी हे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. जगभरात जेवढ्या लोकांना डेंग्यूचा आजार होतो, त्यातील ५० टक्के भारतात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या औषधाचं वैद्यकीय परिक्षण करणे तसेच त्यात विषारी अंश आहेत का त्याची तपासणी करणे, अजून होणार आहे. जर यात यश मिळालं तर आरोग्य मंत्रालय आणि ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया याचा व्यावसायिक उपयोगासाठी परवानगी देऊ शकतो.


हे औषध डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, रॅनबॅक्सीकडून केले जाईल. एका झाडापासून हे औषध शोधण्यात आलं आहे, ज्यात डेंग्यूचा व्हायरस रोखण्याची क्षमता आहे. यात कोणतही केमिकल वापरण्यात आलेलं नाही.