नवी दिल्ली : २०१५ च्या यूपीएससी परीक्षेत टॉप करणारी टीना डाबीनं याच परिक्षेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवणाऱ्या अतहर आमिर उल शफी खान याच्याशी नातं जोडल्याचं जाहीर केलं... आणि उलट - सुलट चर्चेला उधाण आलं. हिंदू महासभेनं तर तिच्या या निर्णयाला 'लव्ह जिहाद'शी जोडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू महासभेनं टीना डाबी हिच्या आई-वडिलांना एक पत्र धाडलंय. या पत्रात त्यांनी टीनाचं हे लग्न मोडण्याचा सल्ला त्यांना दिलाय. टीनाला हा विवाह करायचाच असेल तर अगोदर अतहर आमिर यानं धर्मपरिवर्तन करून त्याची घरवापसी व्हावी, अशी अटही त्यांनी समोर ठेवलीय. 


टीनाच्या या निर्णयामुळे लव्ह जिहादला पाठिंबाच मिळेल, असं त्यांनी म्हटलंय. मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी फॉर अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये सध्या ट्रेनिंग घेणाऱ्या टीनानं अतहरशी आपलं नातं जाहीर केलं असलं तरी विवाहाची तारीख मात्र निश्चित केलेली नाही. लवकरच या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.