म्हैसूर : कर्नाटकमधील म्हैसूर शहर सध्या हिंदू-मुस्लिम प्रेमविवाहामुळे चर्चेत आहे. येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा यांनी प्रेमविवाह केला. मात्र निकाहच्या वेळी काही हिंदू संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शकील अहमद बारासोबत लग्न करण्यासाठी अशिताने काही दिवसांपूर्वी धर्मपरिवर्तन केले, आता तिचं नाव शाईस्ता आहे. या बाबतीत असं सांगितलं जातं की, काही हिंदू संघटनांचा या लग्नाला विरोध असला तरी, मुलगी आणि मुलाचे पालक या विवाहावर ठाम होते. हे दोन्ही जण १२ वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते.


एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या अशिता आणि शकीलने शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण बरोबर घेतले आहे, दोघांनी एमबीएचे शिक्षणदेखील एकत्र घेतले आहे. त्यांच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबीयांकडून कोणताही विरोध नसताना अशिता आणि शकीलमधील प्रेमसंबंध 'लव्ह जिहाद' असल्याचे सांगत काही हिंदू संघटना यास विरोध केला होता, असे असले तरी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून दोन्ही कुटुंबाना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले. 


अशिताचे वडिल नरेंद्र बाबू डॉक्टर असून लग्नाच्या ठिकाणी जाताना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भारतात आपण सर्व समान आहोत. यातून विरोधकांना हाच संदेश जातो. त्यांना हे कळणे गरजेचे आहे. सर्वजण आनंदी असून बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींच्या विरोधामुळे काही फरक पडत नाही.


हा 'लव्ह जिहाद' असल्याचे सांगत, जर हे खरोखरीच प्रेम असेल तर आम्हाला काही अडचण नाही. परंतु, हा जबरदस्तीचा मामला दिसत असल्याचे मत कर्नाटकमधील विश्व हिंदू परिषदेचे सचिव बी सुरेश यांनी या लग्नाविषयी बोलताना व्यक्त केले.