अनंतनाग : जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वंघोषित कमांडर बुरहान वानी ठार मारला गेलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक झडली. कोकरनाग जिल्ह्यातल्या बमदुरा गावात चकमकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर पोलीस आणि लष्कराकडून संयुक्त छापासत्र हाती घेतलं गेलं.


त्यावेळी अतिरेक्यांकडून गोळीबार केला गेला. त्याला सुरक्षा पथकांनीही चोख प्रत्त्युत्तर दिलं. त्यात बुरहान वानी मारला गेला. 


घातपाती कारवायांकरता काश्मीरमधल्या तरुणांची भरती करण्याचं काम वानी करत होता. आपल्या देशाचे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात, या दहशतवाद्याला ठार करणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी सफलता आहे, असं सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडीत यांनी  म्हटलंय.