जयपूर : देशातील सर्वच भागांमध्ये रंगपंचमीचा उत्साह असतो. सगळीकडे रंगाची उधळण केली जाते. पण राजस्थानमधील एका गावात एक वेगळीच प्रकारची रंगपंचमी खेळली जाते. राजस्थानमधील या आदिवासी गांवामध्ये एक रिती चालत आलेली आहे ज्यामध्ये दगडं मारुन रंगपंचमी साजरी केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील बांसवाडा आणि डूंगरपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात अशा प्रकारची अजब रंगपंचमी खेळली जाते. पण या दरम्यान अनेक लोकं जखमी होतात. गेल्या वेळी या गांवामध्ये १०८ रुग्णवाहिका लावण्यात आल्या होत्या.


अनेक लोकं या दरम्यान रुग्णालयात पोहोचतात. येथे लोकं आधीच दगडं गोळा करुन ठेवतात. हा खेळ होलिका दहन झाल्यानंतर सुरु होतो. ढोल आणि नगाडे वाजवले जातात. याला लोकं राड होळी म्हणतात. राड म्हणजे शत्रूता. या खेळात जो अधिक जखमी होतो तो स्वत:ला जास्त भाग्यवान समजतो. पण यामुळे अनेक जण मोठ्या प्रमाणात जखमी होतात.