नवी दिल्ली : मोदी सरकारने निमलष्करी दलाच्या कुटुंबिंयासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशसेवा करतांना जर जवान शहीद झाला तर त्यांना सैन्य धर्तीवर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शहीद जवानांना आता बॅटल कॅजुअल्टी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.


पॅरामिलिट्री फोर्सच्या कुटुंबिंयांना लष्कराकडून सरकारी सुविधा देण्यात येणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. गृहमंत्रालय लवकरच हे लागू करणार आहे.