लखनऊ : उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. 
 
सद्य परिस्थितीनुसार, भाजप 304, सपा-काँग्रेस 70, बहुजन समाज पक्ष 19 तर इतर 10 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, भाजपला हा विजय सहजासहजी मिळालेला नाही. तब्बल 20 वर्षानंतर भाजपला इतका मोठा विजय मिळवणं शक्य झालंय. भाजपनं पहिल्यांदाच उत्तरप्रदेशात 304 चा आकडा गाठलाय. याआधी, 1991 मध्ये भाजपला सर्वात जास्त म्हणजे 221 जागा मिळाल्या होत्या.


भाजपच्या उत्तरप्रदेशच्या विजयाची कारणं


- अमित शहा यांचं संघटनात्मक कौशल्य


- ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यात यश


- मोदींच्या रॅली आणि प्रचारसभांना प्रतिसाद


- दलित - मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न


- महिला मतदारांना सुरक्षेचा मुद्दा भावला


- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा