मुंबई : 'वित्त विधेयक २०१७'नुसार आता पॅन कार्ड बनवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलंय. शिवाय, १ जुलैपर्यंत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्डाला लिंकही करणं गरजेचं असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर अधिनियम - १९६१ च्या कलम १३९ एए नुसार आयकर रिटर्न भरणं आणि पॅन कार्डासाठी आधार नंबर देणं अनिवार्य करण्यात आलंय. 


आधारकार्डाला पॅन कार्ड नंबर जोडण्यासाठी या सिंपल सहा स्टेप्स...


१. इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा. जर तुमचं अकाऊंट नसेल तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी इथे क्लिक करा -  https://incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/UserLogin/LoginHome.html 


२. लॉग इन केल्यावर वरच्या बाजुला दिसणाऱ्या निळ्या पट्टीतील 'प्रोफाईल सेटिंग' या ऑप्शनवर क्लिक करा.


३. प्रोफाईल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 'Link Aadhar' हे ऑप्शन दिसेल. 


४. त्यानंतर समोर दिलेल्या सेक्शनमध्ये आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.


५. ही माहिती भरून झाल्यानंतर खालच्या बाजुला दिसणाऱ्या 'लिंक आधार' ऑप्शनवर क्लिक करा.


आणि झालं तुमचं आधार कार्ड पॅनला लिंक... आहे की नाही सोप्पं... पाहा, आणि ट्राय करा...