हुरियत कॉन्फरन्सचा नेता गिलानीला अटक
हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गिलानी हे फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. गिलानी यांना काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
श्रीनगर : हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गिलानी हे फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. गिलानी यांना काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
हिज्बुल मुजाहिदीन ही अतिरेकी संघटना असल्याचं भारताने यापूर्वी जाहीर केलं आहे.
काश्मिरातील फुटीरतावादी संघटनांनी ९ जुलैपासून बंद पुकारला आहे. हा बंद हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर वणी लष्कराशी उडालेल्या धमुश्चक्रीत ठार झाल्यानंतर जम्मू आणि या बंदमुळे खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही बंद मागे घेण्यात आलेला नाही.
दिल्लीहून राज्यात परतल्यानंतर पोलिसांनी गेल्या मे महिन्यात त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला घरातच नगरकैदेत ठेवण्यात आले होते. राज्यातील तणावपूर्ण शांतता लक्षात घेता अनंतनागमधील सभेला त्याने उपस्थित राहण्यास सुरक्षा दलाने विरोध केला होता. गिलानी याच्याप्रमाणेच इतर फुटीरतावादी संघटनांच्या नेत्यांनाही नजरकैद्येत ठेवण्यात आले आहे.
हुरियत कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या २ संघटनांनी सोमवारी 'अनंतनाग चलो'ची हाक दिली होती. सुरक्षा दलाशी उडालेल्या धुमश्चक्रीत जे ठार झाले आहेत, त्यांच्या नातेवाइकांसह दक्षिण काश्मिरातील जनतेसोबत आपण आहोत.
हे सांगण्यासाठी सभा आयोजित केली होती. या सभेला जाण्यासाठी गिलानी घराबाहेर पडताच पोलिसांनी त्याला अटक केली. गिलानीच्या अटकेनंतर काश्मीरमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात हे लवकरच समोर येणार आहे.