लखनौ : पत्नीनं 'नकार' दिल्यानं पती इतका संतापला की त्यानं आपल्या पत्नीचं नाकच कापून टाकलं. ही धक्कादायक घटना घडलीय ती उत्तरप्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीता गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. तिचा विवाह पाच वर्षांपूर्वी छोटेलाल साहून याच्याशी झाला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून ही महिला आपल्या माहेरी आली होती. तिथेही त्यानं तिचा छळ सुरूच ठेवला.


आपल्या पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पती तिच्या माहेरी दाखल झाला होता. पण, संगीतानं मात्र सासरी जाण्यासाठी त्याला साफ नकार दिला. यामुळे, भडकलेल्या छोटेलालनं चाकूनं संगीताचं नाकच कापून टाकलं... संगीतानं आरडाओरड केल्यानंतर त्यानं तिथून पळ काढला. 


यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केलीय.